क्राईम
अंदर मारना या मरना, सबकुछ…

- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावरुन खुलेआम इशारे दिले जात आहेत. विशेष म्हणजे बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी शशिकांत ऊर्फ बबन गीते याने फेसबुक पोस्ट करून धगधगते वक्तव्य केले आहे.
- या प्रकारामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या कराड आणि घुले यांना तुरुंगात मारहाण झाली. याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली असून त्यांनी मारहाण करणाऱ्यांची नावेही जाहीर केली. त्यांनी महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्यावर आरोप केला आहे.
- या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतले ते शशिकांत ऊर्फ बबन गीते याच्या फेसबुक पोस्टने. गीतेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, अंदर मारना या मरना, सबकुछ माफ है — हा थेट इशारा असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यातून त्याने कराडला लक्ष्य केल्याचे म्हटले जात आहे.
- शशिकांत ऊर्फ बबन गीते हा बीड जिल्ह्यातील मरळवाडी गावचा बड्या राजकीय पार्श्वभूमीचा नेता आहे.
- तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा उपाध्यक्ष होता. त्याच्यावर जून 2024 मध्ये बापू आंधळे या सरपंचाच्या खुनाचा आरोप आहे. आंधळे हे अजित पवार यांच्या गटाशी संबंधित होते. आंधळे यांची हत्या राजकीय वर्चस्वातून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यानंतर बबन गीते तब्बल 9 महिन्यांपासून फरार आहे.



