महाराष्ट्र

ब्रेकिंग! हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले महत्त्वाचे आदेश

  • जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एसएसआरपी) मुदतीत लावण्यासाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी, असे आदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रोजमेर्टा कंपनीला दिले आहेत. 
  • नोंदणी केलेल्या वाहनचालकांना मे, जून महिन्यापर्यंतच्या आरक्षित वेळ आरक्षित करून दिल्या आहेत. त्यामुळे मुदतीनुसार 30 एप्रिलनंतर कारवाई करायची किंवा नाही, असा पेच निर्माण झाल्याने ‘आरटीओ’ प्रशासनाने कंपनीला सूचना केल्या आहेत.
  • तसेच केंद्रांची नियुक्ती करताना कुशल कर्मचारी असतील, अशाच केंदांची नियुक्ती करावी, जेणेकरून दिवसभरात एका केंद्रावर 25-30 वाहनांना पाटी बसविले जाईल, असेही यावेळी बजावण्यात आले आहे.
  • प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशानुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर वाहनचलाकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आत्तापर्यंत सव्वा लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनालाईन नोंदणी केली आहे. 

Related Articles

Back to top button