बिजनेस
ब्रेकिंग! गुढीपाडव्याआधीच सोन्याच्या दरात वाढ

- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोन्याची खरेदी करतात. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याची खरेदी ग्राहकांच्या खिशाला फटका बसवू शकते. याचे कारण म्हणजे गुढीपाढव्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत.
- Good returns वेबसाईटनुसार, आज सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,13,500 रूपये इतकी आहे.
- २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,375 रुपयांना मिळेल.
- २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 67,000 मिळेल.
- १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,750 एवढा आहे. तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,37,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.