क्राईम
गौरीची जीवघेणी चूक! स्वत:च ठरली मृत्यूस कारणीभूत

- पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची तिच्याच पतीने बंगळुरूमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने धारदार चाकूने अनेक वार करून पत्नीचा जीव घेतला आहे.
- पण २४ तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राकेश खेडेकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. दोघेही मुळचे पुण्यातील रहिवासी असून दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
- मयत गौरी ही आरोपी राकेशच्या सख्ख्या आत्याची मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्या अधूनमधून वादाची ठिणगी पडत होती. घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री देखील अशाच एका कारणातून त्यांच्यात वाद झाला.
- हे जोडपे महिनाभरापूर्वी बंगळुरूला राहायला आले होते. इकडे शिफ्ट होत असताना मयत गौरीला आपला जॉब सोडावा लागला होता. मागच्या महिनाभरापासून ती बंगळुरूमध्ये जॉब शोधत होती. मात्र तिला नोकरी मिळत नव्हती. यावरून दोघांमध्ये खटके उडायला सुरू झाले होते.
- पती राकेशमुळेच आपली नोकरी गेली, असा दोष ती पतीला देत होती. याच कारणातून बुधवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला.
- हा वाद विकोपाला गेल्यानंतर राकेशने रागाच्या भरात गौरीला एक चापट मारली. प्रत्युत्तरात गौरी धावत किचनमध्ये गेली आणि राकेशला चाकू फेकून मारला. या हल्ल्यात राकेशला किरकोळ दुखापत झाली. पण अशाप्रकारे हल्ला करणे गौरीच्या जीवावर बेतले.
- तिची ही चूक तिच्याच मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. कारण गौरीने चाकू फेकून मारल्यानंतर आरोपी राकेशने त्याच चाकूने गौरीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की यात गौरीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला.