क्राईम
ब्रेकिंग! स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब

- पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बंद शिवनेरी बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला शिरुर तालुक्यातून अटक झाली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. कारण आता या प्रकरणातील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
- या पत्रात पिडितेने म्हटले आहे की, आरोपी दत्ताने आपल्यावर दोनदा अत्याचार केले. त्यानंतर त्याला आपल्यावर अनैसर्गिक कृत्य करायचे होते. मात्र आपण त्याला विरोध केला. तसेच प्रकरणाचा तपास करताना माझी संमती नसताना देखील पुरूष पोलिसांनी माझी चौकशी केली. त्यात मला वारंवार अत्याचार कसा झाला याची पुनरावृत्ती करावी लागली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना वैद्यकिय चाचणी केली.
- तसेच काही राजकीय नेत्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी तसेच आरोपीचे समर्थन करणारी वक्तव्य केली. त्याची तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच पुढे या तरूणीने म्हटले की, या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पोलिसांनी ही नियुक्ती आम्ही करू, असे म्हटले होते. मात्र यात असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर मी आरडाओरडा का केला नाही? अशी देखील चर्चा झाली. मात्र मी जीवाला घाबरून आरडाओरडा केला नाही, असे या पत्रामध्ये पिडीता म्हणाली आहे.



