बिजनेस

रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

  • आजपासून रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी काही नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. हे बदल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार होत असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. यामुळे रेशन आणि गॅस सबसिडीशी संबंधित प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असल्यास आजपासून त्याची छाननी होणार आहे. डुप्लिकेट कार्ड्स ओळखून ते स्वयंचलितपणे रद्द केले जातील.
  • सर्व रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंगसह e-KYC पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. हे न केल्यास शिधा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
  • रेशन कार्डशी आधार जोडणीबरोबर सक्रिय मोबाईल क्रमांक नोंदवणे गरजेचे आहे. यामुळे OTP किंवा माहिती पाठवणे शक्य होईल.
  • गॅस सिलेंडर घरपोच मिळवताना आता ग्राहकाला मोबाईलवर आलेला OTP सांगणे आवश्यक राहील. OTP शिवाय सिलेंडर डिलिव्हरी केली जाणार नाही.
  • गॅस सबसिडी थेट खात्यावर जमा केली जाते. मात्र, आधार आणि बँक खाते लिंक नसेल, तर सबसिडी मिळणार नाही.

Related Articles

Back to top button