बिजनेस
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर! BHIM 3.0 अॅप लाँच

- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशात भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच BHIM 3.0 मोबाइल अॅप लाँच केले आहे. यामध्ये खास फीचर देण्यात आले आहेत. जुन्या अॅपमध्ये हे फीचर नाहीत. यामध्ये यूपीआय पेमेंटसाठी स्प्लिट एक्सपेन्स, स्पेंड एनालिटिक्स आणि बिल्ड इन असिस्टंट यांसारखे खास फीचर मिळतील. विशेष म्हणजे स्लो इंटरनेट आणि अनस्टेबल इंटरनेट कनेक्शन असले तरी देखील हे अॅप भन्नाट चालेल अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे.
- BHIM 3.0 अॅप काही वैशिष्ट्यांसह येते. या अॅपला 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे खर्च स्प्लिट करू शकता. म्हणजेच युजर्स कोणत्याही खर्चाचे एक बिल तयार करुन त्याला परिवार किंवा मित्रमंडळींसोबत स्प्लिट करू शकतात. कुणी त्यांच्या हिश्श्याचे पेमेंट केले आहे आणि कुणी केलेले नाही याची माहिती देखील या अॅपद्वारेच मिळेल.
- युजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या अकाउंटमध्ये जोडू शकतात. त्यांचा खर्च देखील ट्रॅक करू शकतात. याचा वापर रेंट, बिल पेमेंट किंवा अन्य प्रकारचे पेमेंट असाइन करण्यासाठी केला जाऊ शकतो. या अॅपद्वारे युजर्स त्यांचा खर्च देखील ट्रॅक करू शकतात.
- BHIM 3.0 अॅप युजर्सच्या खर्चाचा ब्रेक डाउनही दाखवेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार अॅपचे डिझाइन यूजर फ्रेंडली ठेवण्यात आले आहे. यामुळे यूजर्स कोणत्याही अडचणीविना त्यांचा खर्च ट्रॅक करू शकतील. यामध्ये बिल्ट इन असिस्टंटचा पर्याय मिळेल.
- या माध्यमातून यूजर्सना त्यांच्या बिल पेमेंटची माहिती मिळेल. BHIM 3.0 अॅप स्लो आणि अनस्टेबल नेटवर्क असतानाही काम करण्यास तयार असेल. इंटरनेटचा स्पीड स्लो असला तरीही पैसे ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पेमेंट अडकण्याचीही काळजी राहणार नाही.