सोलापूर
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अमेरिकेने म्हटले…

- पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात प्रामुख्याने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी अब्दुल रौफ अझहर मारला गेला.
- जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ असलेला रौफ मारला गेल्याने अमेरिकेच्या माजी राजदूताने भारताचे आभार मानले आहे. रौफ हा जैश-ए-मोहम्मदचा सीनिअर कमांडर होता आणि त्याच्याच हातात संघटनेची सूत्रे होती. त्याच्या हत्यामुळे भारताच्या एका प्रमुख शत्रूचा अंत झाल्यासारखे आहे. रौफने 2002 मध्ये ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचा शिरच्छेद केला होता. या क्रूर हत्येचे जगभरात पडसाद उमटले होते. डॅनियल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे वरिष्ठ पत्रकार होते आणि त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्याच दहशतवाद्याला भारताने ठार केल्याने अमेरिकेने आनंद व्यक्त केला आहे.
- अफगाणिस्तान आणि इराकमधील अमेरिकेचे माजी राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी झल्मे खलीलजाद यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत रौफच्या हत्येबद्दल भारताचे आभार मानले आहेत. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान भारताने क्रूरकर्मा दहशतवादी रौफला ठार मारले. 2002 मध्ये त्याने पत्रकार डॅनियलची हत्या केली. ती घटना अद्याप कोणी विसरले नाहीत. रौफ ठार झाल्याने आता न्याय झाला आहे. त्यासाठी ‘थँक यू इंडिया’, असे त्यांनी म्हटले आहे.



