बिजनेस

खुशखबर! अक्षय्य तृतीयेला स्वस्त झाले सोने

  1. देशात आज अक्षय्य तृतीयेचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यात असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत वाढत राहते. अशा परिस्थितीत अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच पहिल्यांदाच एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. परंतु सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच सोन्याच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.
  2. सोन्या, चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदी एक हजार रुपयांनी घसरली आहे तर सोनं मंगळवारच्या तुलनेत एक हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. एमसीएक्सवर आज सकाळपासूनच सोन्याच्या दरांची घसरण सुरू झाली आहे.
  3. रिटेल मार्केटनुसार 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 98 हजार रुपये आहे. 23 कॅरेटचे दर 93, 924 रुपये प्रति तोळा आहे. 22 कॅरेटचे दर 89, 834 रुपये प्रति तोळा आहे. तर 20 कॅरेटचे दर 81, 664 रुपये आहे. 18 कॅरेटचे दर 73, 497 रुपये आहेत. RTGS सह 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 98, 855 रुपये आहे. 23 कॅरेटचे दर 91972 रुपये प्रति तोळा आहे. 22 कॅरेटचे दर 87876 रुपये प्रति तोळा आहे.

Related Articles

Back to top button