घबराने की जरूरत नहीं, पाकिस्तान के पास परमाणु बम

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश असल्याचा अप्रत्यक्ष इशारा भारताला दिला आहे.
पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केला नाही. मात्र या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना, पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश आहे. त्यामुळे कोणीही सहज हल्ला करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. लाहोरमध्ये आयोजित एका समारंभात त्या बोलत होत्या. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण पाकिस्तानच्या सैन्याला अल्लाहने शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याचा सामना करण्याची, देशाच्या रक्षणाची ताकद दिली आहे, असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानचा कोणताही शत्रू पाकिस्तानवर हल्ला करण्याआधी दहा वेळेस विचार करेन, कारण पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असे मरियम म्हणाल्या.



