क्राईम

तपासात आर्थिक तडजोड भोवली

  • सध्या बीड जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांचे या ना त्या कारणाने निलंबन झाले आहे. पोलीस दलात पीएसआयचे नुकतच निलंबन करण्यात आले आहे. रणजीत कासले असे या पीएसआयचे नाव असून परराज्यात तपासासाठी गेला असता त्यांनी तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला. 
  • यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढले आहेत.
  • यामध्ये निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले. पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. कालच बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ही कारवाई झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.
  • कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेतील अनियमिततामुळे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांचेही कालच निलंबन झाले आहे. केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी त्याच्याविषयी तक्रारी विधानसभेत मांडल्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली.

Related Articles

Back to top button