एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना तगडा झटका!

Admin
1 Min Read
  • सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला आता तगडा झटका बसताना दिसणार आहे. माढ्यातील नेते संजय कोकाटे हे पवारांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तशा हालचालीनाही कोकाटेंकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात माढ्याचे गणित बदलताना दिसेल.
  • माढा मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये पवारांनी महायुतीला धोबीपछाड केले होते. यावेळी माढा मतदारसंघातील बहुतांश नेते पवारांकडे आकर्षित झाले होते. मात्र यामधील पवारांच्या पक्षाचे जुने सहकारी असणारे कोकाटे हे सध्या शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
  • लवकरच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत कोकाटे प्रवेश करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. याबाबत कोकाटे यांनी शिंदे यांची भेट देखील घेतल्याचे समजते. त्यामुळे माढ्यामध्ये आता महायुतीला महाविकास आघाडीच्या विरोधातील एक नवा चेहरा मिळणार आहे.
  • कोकाटे यांनी यापूर्वी बबनराव शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. 70 हजार मतांचा वर्ग कोकाटे यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे कोकाटे यांची माढा मतदारसंघात असणारी ताकद देखील मोठी समजली जाते. 
Share This Article