क्राईम

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, xxx खरेदीचा उल्लेख, हॉटेल बुकिंगसह…

  • अमेरिकन नागरिक असलेल्या दिव्या शशिधर यांनी आपल्या पतीविरोधात चेन्नई पोलिसांकडे मदतीची मागणी करत गंभीर आरोप लावले आहेत. त्यांचा दावा आहे की, पती प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले असून त्यांचा छळही केला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिव्याने प्रसन्ना यांना ‘sexual pervert’ संबोधून त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
  • दिव्याच्या म्हणण्यानुसार, प्रसन्ना यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेश्या व्यवसायासाठी संपर्क साधल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांची नोकरी गेली. तिने हेही सांगितले की, प्रसन्ना यांचे महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा इतिहास असून ते हे कृत्य छुप्या कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड करत. दिव्याने स्वतःही अशा छळाला सामोरे जावे लागल्याचा दावा केला.
  • दिव्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना प्रसन्ना शंकर यांनी सांगितले की, त्यांचा घटस्फोट हा पत्नीच्या अनुप नावाच्या व्यक्तीसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे झाला. त्यांनी सोशल मीडियावर काही पुरावे शेअर करत सांगितले की, अनुपच्या पत्नीने त्यांना चॅट्स आणि हॉटेल बुकिंगसह काही स्क्रीनशॉट्स पाठवले होते, ज्यात कंडोम खरेदीचा उल्लेखही आहे.
  • प्रसन्नाच्या मते, ९ कोटींचा सेटलमेंट झाल्यानंतर दिव्याने आणखी पैशांची मागणी केली, जी नाकारल्यामुळे तिने खोटे आरोप करून बदला घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, मुलाची कस्टडी त्यांच्याकडे कायदेशीररित्या आहे आणि मुलगा त्यांच्या ताब्यात स्वेच्छेने देण्यात आला होता, हे एमओयूमध्ये स्पष्ट नमूद आहे.

Related Articles

Back to top button