राजकीय
ब्रेकिंग! राज्यात महायुतीचा दणदणीत विजय, पीएम मोदी म्हणाले

विधानसभा निवडणूक निकालामुळे संपूर्ण देशात आश्चर्याचे वातावरण आहे. राज्यात भाजप आणि महायुतीला इतका मोठा विजय मिळेल, याची कल्पना कुणीही केलेली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना या विजयाचे रहस्य सांगितले आहे. हरियाणानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश आहे, एकता. ‘एक है तो सेफ है’ हा देशाचा महामंत्र बनला आहे. ‘एक है तो सेफ है’ हे महाराष्ट्राने ‘डंके के चोट’ वर सर्वांना सांगितले. या मंत्राने जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर द्वेष पसरवणाऱ्या धडा शिकवला. त्यांना शिक्षा दिली आहे.



