हवामान

ब्रेकिंग! राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या रेड अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळपासून महाराष्ट्रातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला. मुंबईतही पावसाचा जोर प्रचंड होता. विजांच्या लखलखाटासह पाऊस कोसळत होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबईत पावसाला सुरुवात झाली. 
आगामी तीन-चार दिवस महाराष्ट्रात आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. राज्यात पुढील तीन-चार दिवस विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Related Articles

Back to top button