ठाण्याची रिक्षा आणि चेहऱ्यावर दाढी, शिंदेंविरोधात कुणाल कामराचे गाणे

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झाला. कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले आहे. त्याने शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतोय. तर कामराविरोधात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.
व्हिडिओमध्ये कामरा म्हणतोय की, शिवसेना भाजपातून बाहेर आली. त्यानंतर शिवसेना शिवसेनेतूनच आणि एनसीपी एनसीपीतूनच बाहेर आली. ठाण्याची रिक्षा आणि चेहऱ्यावर दाढी, डोळ्यांवर चष्मा. तर मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये…असे देखील म्हटले आहे. दरम्यान कामराच्या या गाण्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे. कामरा याचा शो ज्या हॉटेलमध्ये झाला होता, त्याठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.



