क्राईम

ब्रेकिंग! मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराला झापले

  • कोण गद्दार हे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
  • माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवले आहे. अश्याप्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने सांगितले आहे, स्वातंत्र्याचा स्वराचार करता येणार नाही. कामरा याने माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचे काम केले, हे चुकीचे आहे.
  • स्टँडअप कॉमेडी अशी कॉमेडी करू शकत नाही. व्यंग करण्याचा अधिकार आहे. जाणून अपमानित केले जात असेल. बदनामी करत असेल तर त्याला सहन केले जाणार नाही. त्यावर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे वादाची नवी ठिणगी पडली आहे. 

Related Articles

Back to top button