क्राईम
पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, आधी खटके उडाले, वाद टोकाला गेला..

- राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान भंडारामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे.
- पूर्व वैमनस्यातून आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
- ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात आज सायंकाळी घडली. अंकुश साठवणे (वय ३८) असे मृतकाचे नाव आहे. अंकुश
- हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. तर, मुन्ना बिरणवार (वय ३२) असे आरोपीचे नाव असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि अंकुश
- यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले.
- दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आले. मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली. अंकुश याच्यावर चाकूने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षी धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



