क्राईम
ब्रेकिंग! ‘तो’ अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला

- पुण्यात हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली.
- या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.
- दरम्यान, आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडीमधील ही घटना अपघात नसल्याचे उघड झाले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने केमिकल आणून सीटखाली ठेवत भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली. त्यानंतर केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी चालक गाडीतून उतरला होता. त्याचा दिवाळीत पगार कापला होता.
- तसेच गाडीतील सहकारी कर्मचाऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. त्याचा तिघांशी वाद होता, त्यांना संपवायचे म्हणून त्याने हा प्रकार केला.



