महाराष्ट्र
बिग ब्रेकिंग! वाहनधारकांसाठी खुशखबर

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवण्यात आली आहे. आता 30 जूनपर्यंत वाहनधारक एचएसआरपी नंबर प्लेट बसवू शकणार आहेत.
एप्रिल आणि मेपर्यंतचे स्लॉट बूक झाल्याने अनेकांना अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. तसेच नंबर प्लेट मिळवण्यासाठी देखील विलंब होत होता. परंतु आता मुदत वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवता येणार आहे. आतापर्यंत काहीच वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्तांनी दिली.



