सोलापूर
सोलापूर! लाडकी बहीण योजनेचे पैसे पतीने दारूवर उडवले

- लाडकी बहीण योजनेतून महिलेल्या मिळणाऱ्या पैशांची मागणी दारुड्या नवऱ्याने केली असता पत्नीने त्याला जाब विचारला असता दारुड्या पतीने पत्नीस मारहाण केल्याचे समोर आले आहे.
- ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोणी गावात घडली आहे. लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात पैसे आले होते. आलेले पैसे पतीने दारूवर उडवले. मात्र जेव्हा पत्नीने पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने वार केल्याची धक्कादयक घटना माढा तालुक्यात घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. दरम्यान पीडित पत्नीच्या फिर्यादीवरुन पती आणि सासूवर कुर्डूवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.