महाराष्ट्र
औरंगजेबाच्या कबरीवर xxxची व्यवस्था करावी

- औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर सध्या महाराष्ट्रातील राजकारण केंद्रित झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यातच आता कबर हटवली जात नसेल, तर तेथे थुंकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीच भाजप नेते सुनील देवधर यांनी केली आहे.
- एका टीव्ही चॅनेलशी बोलताना देवधर यांनी, औरंगजेबाची कबर हटवली जात नसेल, तर तेथे थुंकण्याची व्यवस्था करावी. यामुळे तेथील पर्यटनही वाढेल, असे वक्तव्य केले आहे. ही कबर हटवण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता देवधर यांनी हे वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.