महाराष्ट्र
ब्रेकिंग! सुप्रिया सुळेंनी फोडला मोठा बॉम्ब; सहा महिन्यात आणखी एक विकेट पडणार

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पक्षीय कार्यकर्तांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडणार आहे, असे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
- पुण्यात आयोजित पक्षातील बैठकीमध्ये बोलताना सुळे यांनी असे वक्तव्य केले व मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सुळे म्हणाल्या, शंभर दिवसांत एक बळी गेला. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल.
- बायकोच्या आड बोलणाऱ्या त्या मंत्र्याचा बळी जाणार आहे. राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय. तो डरपोक मंत्री कोण हे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे. चार ते सहा महिन्यात त्यांचीही विकेट पडेल.