क्राईम
ब्रेकींग! कुंभमेळ्याला जाण्याआधीच नियतीचा खेळ

- अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम बिरकड यांचे अपघातामध्ये निधन झाले आहे. अकोला-मुर्तीजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉईंटजवळ बिरकड यांचा अपघात झाला.
- बिरकड हे मुर्तीजापूरचे माजी आमदार तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. बिरकड हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी अकोल्यातील सिटी स्पोर्ट क्लब येथे गेले होते. मात्र परत येताना त्यांच्या मात्र परत येताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने धडक दिली.
- बावनकुळे अकोल्यामध्ये असल्यामुळे बिडकर त्यांना भेटण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लबला गेले. या भेटीनंतर बाईकवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रकने बिडकर यांना धडक दिली. या अपघातामध्ये बिडकर यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
- बिडकर हे दोन दिवसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत महाकुंभला जाणार होते, पण त्याआधीच काळाने बिडकर यांच्यावर घाला घातला. बिडकर यांचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाने आक्रोश केला. तुकाराम बिडकर यांच्या पत्नी, भाऊ प्रकाश बिडकर, शत्रूघ्न बिडकर यांना अश्रू अनावर झाले.



