राजकीयसोलापूर

महाविकास आघाडीत फूट

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे.

आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचे सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी कडवे आव्हान दिले आहे. एकीकडे लंके यांनी विखेंविरोधात रान उठवले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापती माजी आमदार विजय औटी यांनी विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विखेंना शह देण्यासाठी लंके यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पायाला भिंगरी बांधून प्रचार सभांचा धडाका लावला आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली असून औटी यांनी लोकसभेसाठी विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे लंकेंसाठी हा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Back to top button