राजकीय

पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी तुफान गर्दी

कोल्हापूर जिल्ह्यात काल सभांचा धडाका होता. महाविकास आघाडी व महायुतीचीही सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतील सभेत हजारो लोकांची गर्दी केल्याने येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. नागरिकांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती.

त्यावेळी त्यांच्यात चेंगराचेंगरी झाली. या सभास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने मैदान अपुरे पडले. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकरांनी नागरिकांना डी झोनमध्ये बसवण्याची पोलिसांना विनंती केली. बसायला जागा मिळत नसल्याने नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांच्या गोंधळामुळे  पवारांना काही वेळ आपले भाषण थांबवावे लागले होते. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर डी झोनमध्ये जाण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली. त्यात काही नागरिक जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले.

Related Articles

Back to top button