राजकीय

पुणे तिथे काय उणे

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे.

दरम्यान, महायुतीला पुण्यात मोठा झटका बसणार आहे. तो म्हणजे शिंदे गटाचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते नाना भानगिरे शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी आणि मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने शिंदे गटाला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
भानगिरे हे शिंदे गटाचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेसाठी बुधवारी नसरापूर येथे आले होते.
त्यामुळे भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. तसेच भानगिरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांकडून हे निमंत्रण टाळण्यात आले. पुणे दौऱ्यावर असतानादेखील मुख्यमंत्री भानगरे यांच्या घरी जेवणासाठी गेले नाहीत. तर ते जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या घरी गेले होते. त्यावरून आता भानगिरे हे थेट शिंदे गटाला रामराम करणार आहेत.

Related Articles

Back to top button