महाराष्ट्र
राज्यपालांना हटवा अन्यथा पुढच्या चार दिवसांत महाराष्ट्र बंद करू

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कोश्यारी यांचे सॅम्पल महाराष्ट्राबाहेर गेले नाही तर महामोर्चा किंवा बंद सारखे आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रातील पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांच्यावर ठाकरे यांनी घणाघात केला. केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचार सरणीची माणसे देशातल्या विविध राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. त्याची कुवत आणि पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल नेमलं जाते का? असा सवाल त्यांनी कोश्यारींचे नाव न घेता केला.