देश - विदेश
ब्रेकिंग! सात दिवसांच्या आत पुरावे द्या नाहीतर संपूर्ण देशाची माफी मागा

- मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मतचोरीसंदर्भातील आरोप फेटाळले.
- त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर त्यांनी सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना संपूर्ण देशापुढे माफी मागावी लागेल.
- सीईसी ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना एक सप्टेंबरपूर्वी प्रारुप मतदार यादीतील त्रुटी दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आयोग त्या त्रुटी दुरुस्त करण्यास तयार असून आक्षेप नोंदविल्यास जबाबदारी संबंधित पक्षावर येईल. निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर त्यांच्याकडे दाव्याचे पुरावे असतील, तर सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्यावे. अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.



