क्राईम
वैष्णवीच्या मृत्यूबाबत पोलिसांना नवा संशय

- पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. पोलिसांनी या मृत्यूत वापरलेली साडी आणि पंखा न्यायवैद्यक तपासणीसाठी (फॉरेन्सिक लॅब) पाठवला आहे, ज्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. ही साडी आणि पंखा तब्बल ७१ किलो वजनाचा भार पेलू शकतो का, याची तपासणी होणार आहे, ज्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूची सत्यता पडताळण्यास मदत होईल.
- वैष्णवीने हिने १६ मे रोजी घरात गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी तिचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिष्मा या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला होता. तिचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे. हे वजन पंखा पेलू शकतो का, याची तपासणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल.
- या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मित्रांकडूनही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीसह अन्य महिलांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असून त्यातून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.



