ब्रेकिंग! ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करून दाखवा

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून कोणत्या या कोणत्या कारणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे.
मात्र या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील दिग्गज राजकीय पदाधिकारी भेट देत आहेत. तसेच आज अजितदादा पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहेत. तसेच यावेळी अजितदादा पवारांनी आढाव यांच्या आंदोलनातील सर्व मुद्दे खोडून काढली.
अजितदादा यावेळी म्हणाले की, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मांडलेल्या भूमिकेतील काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी आम्ही ईव्हीएमबाबत बोललो देखील नाही. तसेच विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यातील जनतेचा कौल हा पाच महिन्यांत बदलला, त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न अजितदादा यांनी आढाव यांना विचारला. तसेच ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान अजितदादा पवारांनी विरोधकांना दिले आहे.