क्राईम
ब्रेकिंग! नागपूर दंगलीचे बांगलादेश कनेक्शन?

- नागपुरात झालेल्या हिसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना नागपूर दंगलीचे बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दिशेने तपासही सुरू केला आहे.
- सोमवारी सायंकाळी नागपुरातील काही भागांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण झाले. काही समाजातील लोक रस्त्यांवर शस्त्र घेऊन धावत होते. यातील काहींनी पोलिसांवर हल्ला केला.
- दरम्यान एका फेसबुक अकाऊंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली.
- या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलीस देखील हादरले आहेत. यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्या आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे. या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला आहे.



