क्राईम
ब्रेकिंग! बीड पोलीस दलात मोठी घडामोड

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. दरम्यान आता बीड पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. महाजन यांची नियुक्ती आता नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.