क्राईम
अटक होण्यापूर्वी दत्ता गाडेने केला आत्महत्येचा प्रयत्न?

- पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मागील दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी गाडेला पोलिसांनी अखेर अटक केली. पुण्याच्या शिरूरमधून पोलिसांनी रात्री दीड वाजता या आरोपीला जेरबंद केले. दरम्यान, आज गाडेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु, आरोपी गाडेने अटक होण्यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येत आहे . याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.
- गावकऱ्यांची या विषयावर चर्चा झाली नाही. काल आरोपीला ज्यावेळी त्याब्यात घेण्यात आले, तिथे अत्यंत गर्दी होती. आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, हा महत्त्वाचा मुद्दा आमच्यासमोर होता. म्हणून त्याला तिथून काढण्यात आले होते. एका एका गोष्टीवर आता तपास सुरु आहे. त्याच्या शरीरावर काही मार्क असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. परंतु, हे कन्फर्म करण्याआधी आम्ही घडलेल्या गोष्टींची खातरजमा करणार आहोत, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.



