महाराष्ट्र

केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत तर…

महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही तर अशा घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात अनेक बदल करण्यात आले. मात्र, केवळ कायदे करणे पुरेसे नाही. पुण्यातीलच एका कार्यक्रमात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडाची आठवण काढली. ते म्हणाले की, महिलां विरोधातील गुन्हे केवळ कायदे करून थांबवता येणार नाहीत तर त्या कायद्यांचे काटेकोर पालन देखील गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना स्वारगेट अत्याचार प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.

केवळ कायद्यांची व्यवस्था करून काहीही होणार नाही. तर समाज म्हणून समाजाची देखील मोठी जबाबदारी आहे. याशिवाय महिलांसाठी करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. आज मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, अभ्यास आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, ही आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button