महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेटसाठी वाहनधारकांची लूट

  • वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी राज्याच एचएसआरपी प्लेट (HSRP) वापरणे अनिवार्य केली आहे. वाहनांच्या हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली वाहनाधारकांची लूट सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. आता या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्ष घातले आहेत. यासंबधी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
  • इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क जास्त असल्याचा आरोप करून हे शुल्क कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
  • एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. या उपक्रमाचा हेतू चांगला वाटत असला तरी या आडून राज्यातील वाहनधारकांची अक्षरशः लूट सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने या नंबर प्लेटसाठी आकारलेले शुल्क हे इतर राज्यातील शुल्काच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहेत. शेजारच्या गोवा राज्यात दुचाकीसाठी 155 रुपये आकारले जातात. तर महाराष्ट्रात हाच दर 450 रुपये आहे. तीनचाकी वाहनांसाठी गोव्यात 155 रुपये तर महाराष्ट्रात 500 रुपये तर चारचाकी वाहनांसाठी गोव्यात 203 रुपये आणि महाराष्ट्रात 745 रुपये आकारले जातात. आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब राज्यातही महाराष्ट्रापेक्षा कमी दर आकारले जातात. मग महाराष्ट्रातच हे दर दुप्पट वा तिप्पट आकारण्याचे कारण काय? या नंबरप्लेटसाठी 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. पण ही बाब आरटीओंनी लपवली आहे, हा भुर्दंडही वाहनधारकाच्या माथीच लादलेला आहे, असा आरोपही पत्रात करण्यात आला.

Related Articles

Back to top button