क्राईम
ब्रेकिंग! आरोपी लपून बसलेल्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर

- स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. यातच आता आरोपी गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी असलेल्या घरात गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे.
- प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरूर मधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे. त्यानुसार आता शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे. आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठले होते. पुणे पोलिसांकडून गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत.
- एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा घटना आता गुनाट गावाच्या शिवारात बघायला मिळत आहेत. पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा परिसरात दाखल झालेला आहे. गाडेच्या शोधासाठी पोलीस या शेतातून त्या शेतात, त्या शेतातून पुढच्या शोधात फिरताना दिसत आहेत. उसाच्या दाट शेतात अतिशय बारकाईने शोध मोहीम सुरु आहे. यासाठी ड्रोन, डॉग स्क्वॉडचा वापर केला जात आहे. पण तरीही गाडे हाती लागायचे नाव घेताना दिसत नाही. यात पोलिसांना आणखी मोठी अडचण म्हणजे संबंधित शेतात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या शोधात आणखी अडथळा वाढताना दिसतोय.