क्राईम

ब्रेकिंग! नराधम दत्ता गाडेचे लोकेशन सापडले

  • पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गेल्या 24 तासांपासून फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गाडेने पुण्यात दुष्कृत्य करून तो सकाळी आपल्या गावी आला आणि दुपारपर्यंत तो आपल्या घरीच मुक्कामी होता, अशी माहिती समोर आली आहे. आता गाडेच्या लोकेशनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
  • आरोपी गाडेच्या लोकेशनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट येथील उसाच्या शेतात तो लपून बसल्याची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यास सुरुवात केली आहे.
  • गुणाट येथे आरोपी गाडे याचा ड्रोन कॅमेरा मार्फत शोध सुरू आहे. तसेच याच ठिकाणी असलेल्या घरात आरोपी गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे काही तासांमध्ये नराधमाच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. 

Related Articles

Back to top button