हवामान
ब्रेकिंग! महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार! दिवसाही काळाकुट्ट अंधार

- गेल्या पाच दिवसांपासून सोलापूरसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील जनजीवन मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाले आहे. राज्यात सकाळपासून आभाळ काळवंडून आले असून काही जिल्ह्यात अंधार पसरला आहे. काही ठिकाणी शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली असून बस सेवा ठप्प झाली आहे. पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत.
- मुंबई उपनगरांसह कोकण, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबई, ठाणे, रायगड,पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्याला यलो अलर्ट जारी करण्यात आली आहे.



