महाराष्ट्र
रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी

- रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतिक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे.
- मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील येत्या होळीला रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे.
- दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत साडीचा वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.