राजकीय

ब्रेकिंग! शिंदे गटाचा अंतर्गत सर्व्हे आला

  • लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे निकाल खोटे ठरवत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले, तर महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. त्यातील एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाने केलेला अंतर्गत सर्व्हे महायुतीसाठी पॉझिटिव्ह ठरताना दिसत आहे.
    महायुतीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास आपण दोनशे पार करू, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला होता. यानंतर शिंदे गटाकडून दुसऱ्यांदा अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे. यानुसार महायुतीसाठी 177 जागांवर अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्नपुर्णा योजनांमुळे महायुतीला फायदा होताना दिसत आहे. पुढील काळात नागरिक अशाच प्रकार योजनांकडे आकर्षित होत राहिले तर महायुती दोनशेचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button