क्राईम

सहलीसाठी आली आणि प्रियकरासोबत पळाली

  • रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शैक्षणिक सहलीमधील एक विद्यार्थिनी प्रियकराबरोबर पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये घडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या युवक जामनेरहून सहलीच्या बसमागून बाईकने आला होता. 
  • जळगाव जिल्ह्यातील जामनेरहून आलेल्या सहलीतील विद्यार्थिनी रायगडावरून खाली उतरल्यानंतर परतताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. यामुळे शिक्षक घाबरून गेले होते. त्या विद्यार्थिनीने सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा मी मागून येते, असे सांगितले होते. ही माहिती शिक्षकांनी पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी शोध घेणे सुरू केले असता येथील खर्डी गावाजवळ ही विद्यार्थिनी एका तरुणाबरोबर बाईकवरून गेल्याचे कळले. यावरून पोलिसांनी शोध घेतला असता जामनेरमधील 19 वर्षांच्या प्रियकराबरोबर ही विद्यार्थिनी गेल्याचे स्पष्ट झाले.
  • हा युवक सहलीच्या बसपाठोपाठ जामनेरहून किल्ले रायगडपर्यंत आला होता. चित्ता दरवाजा येथून विद्यार्थिनीला पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत महाड तालुका पोलिसांनी या युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button