खेळ

बिनडोक @@@#@! शोएब अख्तरने पाकिस्तानची लाज काढली

  1. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दुबईत पाकिस्तानला टीम इंडियाने सहा विकेटने हरवले. या विजयामुळे भारतात सेलिब्रेशनचा माहोल आहे, पाकिस्तानात निराशा आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीज, शोएब मलिक आणि शोएब अख्तरने निराशा व्यक्त केली नाही. उलट मलिक आणि हफीज हसताना दिसले. अख्तर आपल्या टीमच्या पराभवावर म्हणाला की, मी अजिबात निराश नाही. कारण मला माहित होते की पुढं काय होणार आहे. जेव्हा तुम्ही पाचवा गोलंदाज निवडत नाही, तेव्हा जग प्रत्येकी सहा गोलंदाज खेळवत असते. तुम्ही पाचवा गोलंदाज निवडू शकत नाही.
  2. जशी मॅनेजमेंट तसे खेळाडू. ना खेळाडूंना काय माहित, ना मॅनेजमेंटला. त्यांना स्कील सेटची माहिती नाही. फक्त खेळायला गेले. काय करायचे हे कोणालाच माहित नव्हते, अशी टीका अख्तरने केली.
  3. विराट कोहली कौतुकाचा मानकरी आहे. कोहलीने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा देखील पार केला. कोहली खरंच खूप चांगला खेळाडू आहे, असे म्हणत अख्तरने कोहलीचे तोंडभरुन कौतुक देखील केले.

Related Articles

Back to top button