क्राईम

ट्विस्ट! ‘तिच्या’ मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित पुरावे?

  • कळंब येथील मनीषा बिडवे हत्येच्या प्रकरणात आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाला सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाशी जोडण्याचे धागे उघड होत असून मनीषाचा गायब झालेला मोबाईल या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे पोलिसांचे मत आहे.
  • या हत्येप्रकरणातील आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा कळंब पोलिसांनी काल रात्री दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात मनीषा यांचा मोबाईल सध्या आरोपीकडे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
  • या गुन्ह्याची महत्त्वाची दुवा म्हणजे मनीषा बिडवेचा मोबाईल. पोलिसांचा अंदाज आहे की, या मोबाईलमध्ये देशमुख यांच्याशी संबंधित माहिती असू शकते. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मनीषाला कळंबमध्ये आणण्यामागे देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या मोबाईलमध्ये देशमुख यांचे कळंब कनेक्शन अधोरेखित करणारे काही पुरावे आढळू शकतात.
  • या अनुषंगाने डीवायएसपी संजय पवार यांनी सांगितले की, सध्या मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स आणि संदेश तपासून यातील संबंधित पुरावे गोळा करण्यात येत आहेत. देशमुख यांना अडकवण्यासाठी हा मोबाईल वापरण्याचा डाव होता का, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील खुलासे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button