- आमदार विजय देशमुख यांनी आज महानगरपालिका येथील महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनात नॅशनल हायवे अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपूलाचे काम प्रलंबित असल्याने आज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाण पुलाचे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपाकडून करण्यात येणार आहे व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवनपर्यंत या उड्डाण पुलाचे 15 मेपर्यंत पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपाकडून करण्यात येणार आहे, त्यानंतर नॅशनल हायवेकडून 2 महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तसेच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अश्या संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
- याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, राजाभाऊ काकडे आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग! सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलाबाबत मोठी अपडेट
