क्राईम
ब्रेकिंग! एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा

- एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद उफाळल्याची घटना घडली आहे. वादानंतर दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. यावेळी चारचाकी वाहन पेटवण्यात आल्याचीही घटना घडली आहे.
- अकोला जिल्ह्यातील बाळापुरात तालुक्यातील हातरुन गावातून मोठी बातमी हाती आली आहे.
- अकोल्यात दोन गटात वाद पेटल्यानंतर एका गटाने चारचाकी वाहन पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर दोन्ही गटातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या घटनेतील सहा जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हातरून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- हातरुन गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांत आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली आहे.