महाराष्ट्र
ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्याने शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. आता शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक समोर आला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभभस्नानासाठी जाणार आहेत. शिवजयंती साजरी झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचे याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे हे आपल्या सर्व आमदार, खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.
- शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्याने ठाकरे गट आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे गट शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे. हा शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे.