क्राईम
ब्रेकिंग! वाल्मिक अण्णा को दिखाना था, हम कितने डेंजर है

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात गदारोळ झाला आहे. देशमुख हत्या प्रकरणात रोज मोठे खुलासे होत आहे. या प्रकरणी आता भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा दावा केला आहे. वाल्मिक अण्णा को दिखाना है.. हम कितने डेंजर है यासाठी हा खून झाला आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी केला आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वीच दोन कोटींमधले पन्नास लाख दिले होते, असे धस म्हणाले.
धस म्हणाले, सुदर्शन घुले हा वाल्मिकचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. दोन कोटी रुपयांमधील 50 लाख दोन महिन्यापूर्वीच दिले आहेत. खंडणीचे दीड कोटी द्यायचे बाकी होते. आकाचे आणि आरोपींचे बोलणे झालेच असेल. सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले..ते कळेल. पण आता आका वाचणार नाही.