क्राईम

तो चालत घराकडे निघाला होता…

  • राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून हीट अँड रन्स प्रकरणाच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणाला भरधाव कारने उडवले. तरुणाला जोरदार धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला आहे.
  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या उंचगाव या गावात संबंधित घटना घडली आहे. रोहित हप्पे असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा उचगावातला रहिवासी असून तो काल रात्री घराकडे परत येत होता. 
  • त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका कारने रोहितला जोराची धडक दिली. ही धडकी इतक्या जोरात होती की, रोहित हवेत फुटबॉलसारखा हवेत उडून दूरपर्यंत फेकला गेला. यामध्ये रोहितला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहितला धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Related Articles

Back to top button