सोलापूर

वीस वर्ष काय केलात हे जनते समोर येऊन सांगा

  • महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे पदयात्रा कॉर्नर बैठका च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असून मोठया प्रमाणात जनतेचा पाठींबा महेश कोठे यांना मिळत आहे, शनिवारी लक्ष्मी मंडई येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात महेश कोठे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली, यावेळी महेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला
  • यावेळी महेश कोठे यांनी बोलताना विजयकुमार देशमुख यांनी उठसूट माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या मतदार संघात काय केलं हे जनतेसमोर येऊन सांगावं, शहर उत्तर मधील युवकांसाठी तर सोडा तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय केलं हे सांगा, लोक आता वीस वर्षाची भाकरी करपली आहे, त्यामुळे लोकांना आता नवीन भाकरी पाहिजे, त्यामुळे लोकांनी आता नवीन युवकाला संधी देण्याचे ठरवले असल्याचे कोठे म्हणाले.

Related Articles

Back to top button